Posts

साहित्यकृतीतील मेरूमणी भाग १

Image
                       ययाती                     वि स खांडेकर यांच्या एकूण साहित्यकृतींच्या रांगेमध्ये ययातीचे स्थान  सर्वोच्च आहे . ही कादंबरी मनुष्याच्या चिरतरुण राहण्याच्या व भोगवादी प्रवृत्ती वर वेगळा प्रकाश टाकते .  या कादंबरीला  1972  मध्ये सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. एका पौराणिक कथेच्या आधाराने खांडेकर यांनी एक सर्वोत्तम अशी ललित कृती निर्माण केली आहे. कामुक लंपट स्वप्नातही ज्याला संयम ठाऊक नाही असा ययाती राजा   अहंकारी महत्त्वकांक्षी आणि प्रेमभंगाने अंतरंगात द्विधा झालेली देवयानी  तर स्वतःच्या सुखाच्या पलीकडे सहज पाहणारी आणि ययातीवर शरीरसुखाच्या ,  वासना तृप्तीचा पलीकडच्या प्रेमाचा वर्षाव करणारी शर्मिष्ठा  निरपेक्ष प्रेम हाच ज्याचा स्वभाव धर्म झाला आहे असा विचारी संयमी कच  या चार प्रमुख पात्रांमधील परस्पर प्रेमाची विविध रूपे या कादंबरीत चित्रित झालेली पहावयास मिळतात . " ह...

साहित्यकृतीतील मेरुमणी- प्रस्तावना

Image
                                                                  सुट्टीच्या दिवसात ,  अथवा मोकळ्या वेळेत काहीतरी वाचावे वेळेचा सदुपयोग करावा असा विचार साहजिकच आहे. वर्षभरात मुंबई-पुण्याला कामानिमित्त जाणे-येणे होते तेव्हा एखाद दुसरे पुस्तक विकत घेण्याची ईच्छा होते. त्यातून हमखास खरेदी होते. आणि त्यामुळेच माझ्याजवळ आज ग्रंथांचा बर्‍यापैकी संग्रह झाला आहे.पुस्तके ही माणसाला कायम आशावादी ठेवतात असा माझा अनुभव आहे.           ज्याच्या घरात नाही पुस्तकांचे कपाट त्याचे घर होईल भुईसपाट अशी म्हण आपण नेहमीच ऐकत आलो आहोत .घरात एखादे वाचनीय पुस्तक नाही असे घर शोधून सापडणार नाही..ग्रंथ प्रेरणा देतात. हरवलेल्याला   वाट   दाखवतात. अंधारातील दीप बनतात. म्हणूनच .ग्रंथांना गुरूचे स्थान दिले जाते.             ...

मेमोरी कार्ड विकत घेताय? हे नक्की वाचा.

Image
                           जर तुमचा मोबाईल वारंवार आऊट ऑफ स्टोरेज  रंनिंग स्पेस (Out of storage running Space) दाखवत असेल , स्पेस क्लियर करा (clearr some space) सांगत असेल आणि तुम्ही जास्त स्टोरेजचे नवीन मेमोरी कार्ड(memory card) विकत घ्यायचा विचार करत असाल तर खालील माहिती तुम्ही नक्की वाचा. मित्रहो , मेमोरी  कार्ड विकत घेताना साधारणतः ब्रँड , क्षमता , किंमत , स्पीड , वारंटी या वैशिष्ट्याचा विचार केला जातो.   ब्रँड(brand)  :- ब्रँड विश्वासार्ह निवडा. उदा. San disk, Samsung, Kingston,  Sony अशा कंपनी की ज्या खूप वर्षापासून या क्षेत्रात काम करत आहेत. आपल्या उत्पादनाच्या क्वालिटीवर   त्यांचे विशेष लक्ष असते. किंवा असा नवीन ब्रॅंड जो तुम्ही किंवा तुमच्या मित्रपरिवाराने वापरला असेल. ट्रान्सफर स्पीड ( Class) :   मेमोरी  कार्डचा ट्रान्सफर स्पीड ( class )   2, 4 ,6, 8, 10 UHS 3  (ultra high speed), v30...