साहित्यकृतीतील मेरूमणी भाग १

Image result for ययाती कादंबरी
                      ययाती

                   वि स खांडेकर यांच्या एकूण साहित्यकृतींच्या रांगेमध्ये ययातीचे स्थान  सर्वोच्च आहे .ही कादंबरी मनुष्याच्या चिरतरुण राहण्याच्या व भोगवादी प्रवृत्ती वर वेगळा प्रकाश टाकते . या कादंबरीला 1972 मध्ये सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. एका पौराणिक कथेच्या आधाराने खांडेकर यांनी एक सर्वोत्तम अशी ललित कृती निर्माण केली आहे.
कामुक लंपट स्वप्नातही ज्याला संयम ठाऊक नाही असा ययाती राजा अहंकारी महत्त्वकांक्षी आणि प्रेमभंगाने अंतरंगात द्विधा झालेली देवयानी तर स्वतःच्या सुखाच्या पलीकडे सहज पाहणारी आणि ययातीवर शरीरसुखाच्यावासना तृप्तीचा पलीकडच्या प्रेमाचा वर्षाव करणारी शर्मिष्ठा निरपेक्ष प्रेम हाच ज्याचा स्वभाव धर्म झाला आहे असा विचारी संयमी कच या चार प्रमुख पात्रांमधील परस्पर प्रेमाची विविध रूपे या कादंबरीत चित्रित झालेली पहावयास मिळतात ."ही कादंबरी ययातीची कामकथा आहे देवयानीची संसार कथा आहे शर्मिष्ठा ची प्रेमकथा आहे आणि कचाची भक्तीकथा आहे हे लक्षात घेऊनच वाचकांनी ती वाचावी" अशी अपेक्षा स्वतः खांडेकरांनी व्यक्त केली आहे.       
पुस्तक विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा - ययाती




     मृत्युंजय 


                 मृत्युंजय ही कादंबरी शिवाजी सावंत यांनी कठोर परिश्रम घेऊन लिहिली आहे. दानशूर कर्ण , महारथी कर्ण, सूर्यपुत्र अंगराज कर्ण यांची ही कहाणी आहे. बऱ्याच भागामध्ये कर्ण स्वतः आपली कहाणी सांगत आहे अशा शैलीने लिखाण केल्याने आपण कर्णाच्या पात्रात कधी गुंतून जातो हे कळतही नाही. कर्णाच्या महापराक्रमाचे वर्णन येथे आहे.

शिवाजी सावंत यांनी विविध अलंकारांची उधळण करून कादंबरी सुंदर आणि आकर्षक बनवली आहे.


कुंतीला दिलेल्या वचनानुसार कर्णाने युधिष्टर,भीम, नकुल, आणि सुखदेव यांना युद्धामध्ये जीवनदान दिले. कर्णाने ठरवले असते तर तो युधिष्टराला पराभूत करून युद्ध समाप्त करू शकला असता मात्र कुंतीला दिलेल्या वचनामुळे कर्णाने असे केले नाही, असे दान केवळ ज्येष्ठ कौंतेय करू शकत होता जर युद्ध आणि योद्धा हे धर्माच्या परिप्रेक्षात महाभारत झाले असते तर निश्चितच कर्ण हा अजिंक्य राहिला राहिला असता. तरीही मृत्युला आलिंगन देऊन ही तो मृत्युंजय ठरला आहे.मनाला आणि विचारांना समृध्द करणारी आपल्या संग्रही ठेवावी अशीच आहे.

पुस्तक विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा - मृत्युंजय






वपूर्झा




व पू काळे हे मध्यमवर्गीय माणसाची सुख दुःख साहित्यात चित्रित करणारे लेखक. वपुर्झा हे पुस्तक वाचायला घेतले तेव्हा वाटले एखादा कथा संग्रह असेल, कादंबरी असेल पण उघडून पाहिले तर अनुक्रमणिका, क्रमांक, संदर्भ काहीही नाही.माझ्या मनाचा हिरमोड झाला. पुस्तक बाजूला ठेवून दिले.

दोन दिवसानंतर मनावरील धूळ बाजूला झाली. एका शांत क्षणी पुस्तक पुन्हा वाचायला घेतले. आणि समुद्रात डुबकी मारून रंगीबिरंगी मोती हाताला लागावे तसा अनुभव आला. हवं ते पान उघडा आणि जीवन समृद्ध करणाऱ्या अनुभवसंपन्न वाक्यांच्या फुलांना हळूवार स्पर्श करा. एका बैठकीत पुस्तक वाचावे असे हे पुस्तक नाही. मात्र विशाल आशय कवेत घेणारी वाक्ये तुम्हाला जीवनात पदोपदी उपयोगी ठरतील हे मी ठामपणे सांगू शकतो.
या वाक्यांची ही उदाहरणे तुम्ही स्वतःच वाचून बघा.

  • अश्रु म्हणजे दुबळेपणा नाही. पावसाळी ढग जसे बरसल्यावर हलके होतात. आणि दिसेनासे होतात, तसा माणुसही हलका होतो. आकाशाजवळ पोहोचतो. असंच कोणतं तरी दुःख पार केल्यावर तुकाराम " तुका आकाशायेवढा " असं लिहुन गेला असेल.

  • सर्वात जिवघेणा क्षण कोणता? खूप सद्भावनेनं एखादी गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा काहीही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणा यावा, सद-हेतूंचीच शंका घेतली जावी, हा!

  • स्त्रीला जन्माला घालताना परमेश्वराने तिला विचारलं, 'तुला बुद्धी हवी का सौंदर्य?’ तेंव्हा ती स्त्री म्हणाली, 'बुद्धीची गरज नाही, सौंदर्यच दे! 'का?' 'बुद्धीच्या सामर्थ्यावर सौंदर्य मिळवता येत नाही, पण सौंदर्याच्या जोरावर बुद्धी विकत घेता येते.

  • आपत्ती पण अशी यावी कि तिचा इतरांना हेवा वाटावा....व्यक्तिचा कस लागावा.पडायचंच असेल तर, ठेच लागुन पडू नये, चांगलं २००० फ़ुटांवरुन पडावं..म्हणजे माणूस किती उंचावर पोचला होता हे तरी जगाला समजेल. !"

  • जाळायला काही नसलं की पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझते.

  • प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही,कधी ना कधी ते पळणार्‍याला गाठतातच,पळवाटा मुक्कामाला पोहचवत नाहीत, मुक्कामाला पोहचवतात ते सरळ रस्तेच..


-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


                             बनगरवाडी


                   माणदेशातल्या एका 'लेंगरवाडी' नावाच्या वाडीवर बेतलेली कथा. स्वत: माडगूळकरही त्याच भागातले. त्यामुळे हे वर्णनात अगदी अस्सल जिवंतपणा ,ग्रामीणता आहे.  तेथील कंगालपणा, दुष्काळ, उजाड व पर्णहीन सृष्टी . वाडीतील सण, उत्सव, रूढी, परंपरा, श्रद्धा, संकेत, मिथके, वाडीतील माणसांच्या आयुष्यातील होरपळ यथार्थपणे आहे. या कादंबरीला कोणी नायक व नायिका नाही.संपूर्ण कथानक वाडीतील माणसे व दुष्काळ याभोवती फिरताना दिसते. पन्नास वर्षांनंतर १९९९ साली माडगूळकरांनी कादंबरीत काही रेखाटने करावी असे ठरल्याने ते पुन्हा त्या वाडीत गेले. लेंगरवाडीत जवळजवळ साठ वर्षांनीही काही फरक पडला नसल्याचेच त्यांना जाणवले.

                 ते लिहितात “आज वर मी बरीच पुस्तकं लिहिली रचनात्मक काम दृश्य स्वरूपात कठीण असतं वेलाला आले कलिंगड दाखवावे तसे मी एकच पुस्तक दाखवीन. बनगरवाडी !”.

पुस्तक विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा - बनगरवाडी


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मेमोरी कार्ड विकत घेताय? हे नक्की वाचा.

साहित्यकृतीतील मेरुमणी- प्रस्तावना