जर तुमचा मोबाईल वारंवार आऊट ऑफ स्टोरेज रंनिंग स्पेस (Out of storage running Space) दाखवत असेल, स्पेस क्लियर करा (clearr some space) सांगत असेल आणि तुम्ही जास्त स्टोरेजचे नवीन मेमोरी कार्ड(memory card) विकत घ्यायचा विचार करत असाल तर खालील माहिती तुम्ही नक्की वाचा.
मित्रहो ,मेमोरी कार्ड विकत
घेताना साधारणतः ब्रँड,
क्षमता, किंमत,
स्पीड, वारंटी या वैशिष्ट्याचा विचार केला जातो.
- ब्रँड(brand) :- ब्रँड विश्वासार्ह निवडा. उदा. San
disk, Samsung, Kingston, Sony अशा कंपनी की ज्या खूप वर्षापासून या क्षेत्रात काम करत
आहेत. आपल्या उत्पादनाच्या क्वालिटीवर त्यांचे विशेष लक्ष असते. किंवा असा नवीन ब्रॅंड जो तुम्ही
किंवा तुमच्या मित्रपरिवाराने वापरला असेल.
- ट्रान्सफर स्पीड (Class): मेमोरी कार्डचा ट्रान्सफर स्पीड (class) 2,
4 ,6, 8, 10 UHS 3 (ultra high speed), v30 वगैरे. असा असतो. Class
10 असेल तर साधारणतः 95Mbps असा ट्रान्स्फर स्पीड असतो.
अर्थात जास्त स्पीड म्हणजे जास्त किंमत.
- साठवण क्षमता(storage capacity):- मेमोरी कार्डची साठवण क्षमता ही मोबाईलची मर्यादा व तुमच्या आवश्यकतेनुसार
निवडा. साधारणतः 32GB , 64GB 128GB , 256GB ईत्यादी.
SD card हे HC ( High capacity), XC
(extended capacity) अशा प्रकारात मिळते . या
दोन्ही मध्ये डाटा साठवण क्षमतेचा फरक असतो.
- किंमत(price): ऑफलाईन व ऑनलाईन अशा दोन्ही ठिकाणी किमतीमधील फरक तपासून पाहू शकता. Amazon, Flipkart सारख्या
वेबसाईट वर तुम्हाला घरपोच सेवा देतात. वस्तू मिळाल्यावर पैसे देता येतात. आवडली नाही तर १० दिवसात परत करता येते. एखादं दुसऱ्या ऑफर चा लाभ
घेता येतो.
- वारंटी (warranty):- मेमरी
कार्ड १ ते १० वर्षांपर्यंत वारंटीचे मिळतात.आपल्या गरजेप्रमाणे त्यांची निवड
करा. वारंटी म्हणजे एक प्रकारचे सुरक्षा कवच.
- App performance class A1
and A2:- जेव्हा मोबाईलची इंटरनल मेमोरी अपुरी पडते त्यावेळी आपण काही अॅप SD card वर
इंस्टॉल करतो. अशावेळी ते अॅप कमी वेळात उघडण्यासाठी (load) App performance class आपण हे फिचर उपयोगी पडते. App performance class हे A1 आणि A2 अशा दोन प्रकारात उपलब्ध आहे. यांची read
आणि write
करण्याची क्षमता हा त्यामधील महत्वाचा फरक आहे.
- इतर:- उच्चप्रतीचे मेमोरी कार्ड हे पाणी,
तापमान,
चुंबक,
क्ष किरण यांच्या परिणामापासून बचावासाठी सक्षम
असतात.
- महत्वाचे :- Amazon, Flipkart सारख्या
वेबसाईटवर ऑनलाइन खरेदी करताना ग्राहकांनी दिलेले review वाचून बघावे.
मेमरी कार्ड विषयी अजूनही काही नवीन वैशिष्टे
असतील तर comment box मध्ये सुचवू शकता.
हा लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा.

Awesome post! Keep up the great work
ReplyDeletespardhajagat.com