साहित्यकृतीतील मेरूमणी भाग १

Image
                       ययाती                     वि स खांडेकर यांच्या एकूण साहित्यकृतींच्या रांगेमध्ये ययातीचे स्थान  सर्वोच्च आहे . ही कादंबरी मनुष्याच्या चिरतरुण राहण्याच्या व भोगवादी प्रवृत्ती वर वेगळा प्रकाश टाकते .  या कादंबरीला  1972  मध्ये सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. एका पौराणिक कथेच्या आधाराने खांडेकर यांनी एक सर्वोत्तम अशी ललित कृती निर्माण केली आहे. कामुक लंपट स्वप्नातही ज्याला संयम ठाऊक नाही असा ययाती राजा   अहंकारी महत्त्वकांक्षी आणि प्रेमभंगाने अंतरंगात द्विधा झालेली देवयानी  तर स्वतःच्या सुखाच्या पलीकडे सहज पाहणारी आणि ययातीवर शरीरसुखाच्या ,  वासना तृप्तीचा पलीकडच्या प्रेमाचा वर्षाव करणारी शर्मिष्ठा  निरपेक्ष प्रेम हाच ज्याचा स्वभाव धर्म झाला आहे असा विचारी संयमी कच  या चार प्रमुख पात्रांमधील परस्पर प्रेमाची विविध रूपे या कादंबरीत चित्रित झालेली पहावयास मिळतात . " ह...

साहित्यकृतीतील मेरुमणी- प्रस्तावना

                           
                   



                  सुट्टीच्या दिवसातअथवा मोकळ्या वेळेत काहीतरी वाचावे वेळेचा सदुपयोग करावा असा विचार साहजिकच आहे. वर्षभरात मुंबई-पुण्याला कामानिमित्त जाणे-येणे होते तेव्हा एखाद दुसरे पुस्तक विकत घेण्याची ईच्छा होते. त्यातून हमखास खरेदी होते. आणि त्यामुळेच माझ्याजवळ आज ग्रंथांचा बर्‍यापैकी संग्रह झाला आहे.पुस्तके ही माणसाला कायम आशावादी ठेवतात असा माझा अनुभव आहे.  
       ज्याच्या घरात नाही पुस्तकांचे कपाट त्याचे घर होईल भुईसपाट अशी म्हण आपण नेहमीच ऐकत आलो आहोत .घरात एखादे वाचनीय पुस्तक नाही असे घर शोधून सापडणार नाही..ग्रंथ प्रेरणा देतात. हरवलेल्याला वाट दाखवतात. अंधारातील दीप बनतात. म्हणूनच .ग्रंथांना गुरूचे स्थान दिले जाते.

                              मायमराठीतील विविध ग्रंथांनी वाचकाच्या मनाला भुरळ घातली आहे . महाराष्ट्रातील महानुभाव संप्रदाय ,नाथ संप्रदायदत्त संप्रदाय,वारकरी संप्रदाय,दास संप्रदाययांनी आपल्या लीला , ओवी,अभंगभारुडगवळण अशा विविध प्रकारातून महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम केले आहे.


                    आधुनिक काळातील  केशवसुत,कुसुमाग्रजपु ल देशपांडेव्यंकटेश माडगूळकरअण्णाभाऊ,गंगाधर गाडगीळरत्नाकर मतकरी, व. पू. काळे. विश्वास पाटील,रणजित सावंतअरविंद सावंत अशा अनेक लेखकांच्या बहारदार लेखणीत आजही वाचकांना खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य आहे. 

                   आज कविता,कथा,नाटकललित साहित्य,प्रवास वर्णनअशा विविध प्रकारात मराठी साहित्य वसंतात झाडांनी मोहरावे तसे मोहरुन आले आहे. ज्ञांनेश्वरांच्या शब्दात सांगायचे झाले तर म्हणता येईल-

             " माझा मराठीची बोलू कौतुके। 
               परि अमृतातेहि पैजासी जिंके।"
    
           
   


Up to 50% Off On Web Hosting


Comments

Popular posts from this blog

मेमोरी कार्ड विकत घेताय? हे नक्की वाचा.

साहित्यकृतीतील मेरूमणी भाग १